● आठवडाभरात मान्सूनचं केरळात आगमन, तर त्यापूर्वी राज्यभरात अवकाळी पाऊस पडणार ; हवामान खात्याचा माहिती.
● चॅम्पियन ‘चेन्नई सुपर किंग्ज’ पाचव्यांदा झाली चॅम्पियन; बलाढ्य गुजरातला हरवून धोनीचा चेन्नईचा संघ पुन्हा बनला आयपीएलचा चॅम्पियन.
▪️ 2,000 रुपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय: 2,000 रुपयांच्या नोटा रिक्विजिशन स्लिप, आयडी प्रूफशिवाय बदलण्याच्या परवानगीला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली
▪️ नुकसान भरपाईबाबत बातमी: राज्यात पंचनाम्यांच्या पद्धतीत सुधारणा करून मोबाईल ॲपद्वारे पंचनामे करावेत, ई-पंचनाम्यानुसार 15 दिवसांत बाधितांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी व्यवस्था तयार करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
▪️ दिल्ली पुन्हा हादरली! दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात 28 मे रोजी रात्री 16 वर्षीय साक्षीची 21 हुन अधिक वेळा चाकूने भोकसून निर्घृणपणे हत्या, आरोपी युवकाला उत्तरप्रदेशातील बुलंद शहरमधून अटक
▪️ शेअर बाजार: सेन्सेक्स 344 अंकांनी वाढून 62,846.38 अंकांच्या पातळीवर बंद, तर निफ्टी 99 अंकांनी वाढून 18,598.65 अंकांवर बंद
▪️ ISRO ने नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 चे श्रीहरिकोटा येथून केलं यशस्वीरित्या प्रक्षेपण; इस्रोकडून येत्या जुलैमध्ये चांद्रयान-3 लॉंच करण्यात येणार
▪️ सीएनजी कारच्या लोकप्रियतेत वाढ, भारतातील सीएनजी स्टेशन दोन वर्षांपूर्वीच्या 1,500-2,000 वरून आता 5,500 पर्यंत वाढले
▪️ सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55,550 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 60,600 रुपये
● चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं निधन; दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास.
●आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागाने राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.
● इस्रोकडून चांद्रयान-3 मोहिमेची घोषणा: 12 जुलै रोजी श्रीहरीकोटामधील अंतराळ केंद्रावरून चांद्रयान- 3 उपग्रहाचं प्रक्षेपण होणार.
● मंदिरात ड्रेसकोड लागू करणं चुकीचं, मग पुजाऱ्यांना ड्रेस घालायला द्या, छगन भुजबळ यांची सडकून टीका.
● नोट बदलीसाठी नक्षलवाद्यांच्या महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर हालचाली, नक्षल समर्थकांवर पोलिसांची करडी नजर.
● गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रकारच्या जाहिरातींमध्ये 1 ऑगस्टपासून क्यूआर कोड बंधनकारक.
● स्त्री पुरुषांना लिंग ओळख निवडण्याचा अधिकार हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग; राजस्थान उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा.
● कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी आणि विनेश यांच्या विरोधात FIR; दंगल भडकावण्यासह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल.