X

News:सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 29 एप्रिल 2023

मतदारांचा कौल कोणाला? 95 बाजार समित्यांमध्ये आज मतमोजणी. सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला.

मॉरिशसमध्ये शिवछत्रपतींचा जयजयकार; छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण, कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित.

शिर्डी बंदचा निर्णय तुर्तास मागे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांचा निर्णय.

▪️ राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असून, राज्यात १ मे पर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज कायम राहणार आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

▪️ मुंबई करांसाठी मोठी आहे ती म्हणजे बेस्ट बसमध्ये प्रवास करताना मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात बोलण्यास आता मनाई करण्यात आली आहे.

▪️ अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यात दिवाळीची अधिकृत सुट्टी असावी असा एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. जो अखेर मंजूर झाला आहे.

▪️ यानुसार दिवाळीला सर्व सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज आणि अन्य संस्थांची कामे बंद असतील. या राज्यात जवळपास 2 लाखांहून अधिक भारतीय लोकं राहतात आणि त्यामुळे त्याच्या दृष्टीने अनेक निर्णय याआधी देखील घेतले गेले आहेत.

▪️ मोठी बातमी ! पाकिस्तान आणि चीनची चिंता आता आणखी वाढणार आहे कारण भारतीय सैन्याचे सायबर हल्ले रोखण्यासाठी ‘स्पेशलिस्ट युनिट’ तयार झाले आहे.

▪️ बोर्नव्हिटा प्यायल्याने मुलांच्या शारीरिक वाढीस आणि विकासासाठी चालना मिळते असे आपल्या जाहिरातींमधून सांगणाऱ्या बोर्नव्हिटाला सर्व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, पॅकेजिंग आणि लेबल्स हटवण्याचे आदेश National Commission For Protection Of Child Rights म्हणजे NCPCR ने दिले आहेत.

▪️ एका वायरल व्हिडियो मुळे हा मुद्दा उपस्थित झाला होता. बोर्नव्हिटामध्ये हाय शुगर कंटेन्ट असतो जो शरीरासाठी हानिकारक असतो असा दावा या व्हिडियोमधून करण्यात आला होता.

बारसूमधील आंदोलक आक्रमक, सर्वेक्षणच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अडवल्यानं वातावरण निवळलं.

काळजी घ्या! मे महिन्यात कमाल तापमान अधिक राहणार; भारतीय हवामान विभागाचा अंदाज.

कर्नाटकसाठी भाजप सज्ज; सहा दिवस 22 रॅली, स्टार प्रचारकांची फौज तर पंतप्रधानांच्या 22 सभा होणार.

● मधमाश्यांच्या हल्ल्यात वाढ ; मधमाशांचा हल्ल्यात एकाच कुटुंबातील 10 जण गंभीर जखमी; सिंहगड किल्ल्याजवळील घटना.

● IPL 2023 PBKS vs LSG : लखनौच्या संघाची रेकॉर्ड ब्रेक खेळी, लखनौचा पंजाबवर 56 धावांनी विराट विजय, मराठमोळा अथर्वची झुंजार खेळी व्यर्थ.

This post was last modified on %s = human-readable time difference 3:17 am

Davandi: