Navratri Kanya Pujan 2024 : नवमीच्या दिवशी कन्या पूजन: शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Navratri Kanya Pujan 2024 : नवमीच्या दिवशी कन्या पूजन: शुभ मुहूर्त आणि महत्त्वशारदीय नवरात्र उत्सवाची सांगता ही विजयादशमीनंतर होते. यावेळी अष्टमी आणि नवमी तिथीला फार महत्त्व आहे.

या दिवशी कन्या पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी कुमारिकांना घरी बोलावून त्यांना जेवण दिलं जातं. तसेच, त्यांची पूजा केली जाते. तर आज आपण नवमी तिथीचा शुभ मुहूर्त काय आहे ते जाणून घेऊयात.

नवरात्रीची नवमी तिथी कधी? :

Navratri Kanya Pujan 2024 : आज नवरात्रीची नवमी तिथी आहे. नवरात्रीची नवमी तिथी ही देवी दुर्गेला समर्पित आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

नवरात्रीत नवव्या दिवशी कन्या पूजनाबरोबरच देवीचे हवन आणि पूजन देखील केले जाते. या दिवशी देवीच्या सिद्धीदात्री रुपाची पूजा करतात.

हवन आणि कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त हा दुपारी 12 वाजून 7 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे या वेळेत तुम्ही कन्या पूजन करू शकता.

WhatsApp Image 2024 10 10 at 10.42.39 PM

शुभ दसरा! जाणून घ्या तिथी, शस्त्र पूजन मुहूर्त आणि शुभ योग

WhatsApp Image 2024 10 10 at 10.42.39 PM 2

येथे फक्त 199/- मध्ये पूर्ण एक वर्ष, सर्व प्रकारचे आकर्षक अनलिमिटेड डिजाइन मिळतील

दसऱ्याची तिथी आणि मुहूर्त:

  • तिथी: [१२ ऑक्टोबरला सकाळी]
  • शस्त्र पूजन मुहूर्त: [दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी २ वाजून ३ मिनिटांपासून ते २ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असेल.]
  • शुभ योग: [ दसऱ्याला रवि योग दिवसभर असल्यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतील. तसेच सकाळी ६ वाजून २० मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल]

दसऱ्याचे महत्त्व: दसरा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे. या दिवशी रामाने रावणाला पराजित केले होते. दसरा हा बुराईवर चांगल्याचा विजय आणि सत्य आणि धर्माचा प्रतीक आहे.

WhatsApp Image 2024 10 10 at 10.42.38 PM

शस्त्र पूजन: दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजन करण्याची परंपरा आहे. या दिवशी शस्त्रांची पूजा करून त्यांना पवित्र मानले जाते.

tc
x