
Nagpur Violence Live Updates
Nagpur Violence Live Updates : नागपूरमध्ये सोमवारी, १७ मार्च २०२५ रोजी, औरंगजेबाच्या कबरीविरोधात दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. महाल परिसरातील शिवाजी पुतळा चौकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली, ज्यामुळे तणाव निर्माण झाला.
Nagpur Violence Live Updates : संध्याकाळी, दोन गटांमध्ये दगडफेक सुरू झाली, ज्यात काही पोलीस अधिकारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. या हिंसाचारामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
Nagpur Violence Live Updates : सध्या, नागपूरच्या कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पचपावली, शांतिनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अनिश्चितकालीन कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा : “मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना” महिला बालविकास विभागाचे स्पष्टीकरण