NAGPUR : नागपूरच्या महाल आणि हंसापुरी परिसरात १७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कदापि माफी दिली जाणार नाही.
NAGPUR : मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘औरंगजेबाची कबर हटवा’ अशी मागणी करत आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी प्रतिकात्मक कबर जाळली. या घटनेनंतर दुपारी गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते.
सायंकाळी, अफवा पसरली की जाळलेल्या प्रतिकात्मक कबरीवरील कापडावर धार्मिक मजकूर होता. यामुळे नमाज आटोपून येणाऱ्या २०० ते २५० लोकांच्या जमावाने घोषणाबाजी करत हिंसक वर्तन केले. पोलिसांनी त्यांना थांबवण्यासाठी बळाचा वापर केला.
हेही वाचा : मुलीला 1 लाख 1 हजार रुपये मिळणार! योजनेबद्दल!!
NAGPUR : हंसापुरी भागात २०० ते ३०० लोकांच्या जमावाने दगडफेक केली आणि १२ दुचाकींचे नुकसान केले. भालदारपुरा भागात जमावाने पोलिसांवर हल्ला केला, ज्यात ३३ पोलीस जखमी झाले, त्यापैकी तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी होते. एका डीसीपीवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि कोणतीही जात-धर्म न पाहता दंगल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कदापि माफी दिली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
हेही वाचा : “सिनिअर सिटीझन 🪪कार्ड: अनेक सुविधा घ्या, फक्त एक कार्ड!