Nagpanchami : श्रावणातील पहिला सण नागपंचमी का साजरी करतात?

Nagpanchami : या दिवशी नागांची पूजा केल्याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदंशाची भीती नसते.

नागपंचमी कधी आहे, शुभ मुहूर्त, महत्त्व, मंत्र जाणून घेऊया.

नागपंचमी शुभ मुहूर्त

यावर्षी नागपंचमी शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे.

Nagpanchami : नागपंचमीच्या दिवशी पूजा केली जाते.

या पूजेसाठी शुभ मुहूर्त 9 ऑगस्ट रोजी सकाळी 12.36 वाजता सुरु होईल आणि 10 ऑगस्ट रोजी पहाटे 3.14 वाजता संपेल.

नागपंचमी महत्त्व

हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे.

नागपंचमीच्या दिवशी शेतात सुख, समृद्धी आणि पिकांच्या रक्षणासाठी नागांची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते.

नाग हा शिवशंकराच्या गळ्यातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूचा पलंगदेखील आहे.

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास त्यांच्या जीवनातून काल सर्प दोष नाहीसा होतो, असे मानले जाते.

या दिवशी नागांची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते.

या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो.

नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर नागाचे चित्र लावल्यास त्या घरावर नाग देवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांचे सर्व दुःख दूर होतात.

नागपंचमी का साजरी करतात. >>> येथे क्लिक करा <<<

tc
x