mukhymantri ladki bahin yojna yadi : महाराष्ट्रातील गरीब महिलांना सरकार दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देत आहे, ज्यामध्ये राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना दरमहा 1500 रुपये याप्रमाणे वर्षाला 18000 रुपयांचा लाभ मिळणार आहे.
सरकारने अर्थसंकल्पात सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतून 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
ऑनलाईन तपासा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थींची यादी
ज्या महिलांनी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून अर्ज केला आहे अशा महिलांच्या नावाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यादी शासकीय योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. ज्या महिलांची नावे यादीत समाविष्ट केली जातील, त्यांना योजनेच्या पहिल्या हप्त्याचे 1500 रुपये DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.
● मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना यादीत आपले नाव पाहण्यासाठी सर्वप्रथम, माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि मुख्यपृष्ठावरील “लाभार्थी यादी” (Beneficiary List)या लिंकवर क्लिक करा.
● पुढे, तुमचा जिल्हा, तहसील, गाव आणि प्रभाग निवडा आणि खाली दिलेल्या चेक लिस्ट (Check List) बटणावर क्लिक करा.
● यानंतर, माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता तुम्ही तुमचे नाव माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत पाहू शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कधी येणार?
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट ठेवण्यात आली असून, त्यानंतर म्हणजेच सप्टेंबरमध्ये योजनेच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे सप्टेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत जमा होतील.
हेही वाचा >>> आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांनी उत्तरे! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने विषयी