mukhymantri ladki bahin yojna : सेतू सुविधा केंद्राने पैसे मागितले तर परवाना होणार रद्द

mukhymantri ladki bahin yojna : सेतू सुविधा केंद्राने पैसे मागितले तर परवाना होणार रद्द

लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल

एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना मिळणार लाभ

सेतू सुविधा केंद्राने पैसे मागितले तर परवाना होणार रद्द

सेतू केंद्राला प्रत्येक अर्जमागे सरकार 50 रुपये देणार

हेही वाचा : 7 मोठे बदल सोप्या भाषेत, *मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मध्ये वयाची अट, रहिवासी दाखला


राज्य सरकारच्यावतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच विद्यमान राज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये, महिला, शेतकरी आणि गृहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा आणि क्रांतीकारी निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा होय.

या निर्णयाच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शासनाने ही योजना आणखी सुलभ करण्यासाठी योजनेच्या निकषांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार, आता 21 ते 65 वर्षांपर्यंतच्या सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर, एका कुटुंबातील 2 महिलांना याचा लाभ मिळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. सरकारने या योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार, एका कुटुंबातील दोन महिलांना ह्या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार, एक विवाहित आणि एक अविवाहित महिला भगिनींना देखील योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.

आम्ही कुटुंब नियोजन करुन चूक केली का, असा जो सवाल येतो त्याच प्रश्नाचं उत्तरही यातून दिलंय, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, 1 जुलैपासून पुढील 60 दिवसांत जे अर्ज करतील, त्यांना 1 जुलैपासूनचे पैसे मिळतील आणि 1 ऑगस्टनंतर जे अर्ज करतील, त्यांना अर्ज केल्यानंतरच्या महिन्यापासून पैसे मिळतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद सभागृहात माहिती देताना दिली.

एजंटच्या नादी लागू नये >>> येथे क्लिक करा <<<

tc
x