Mukhyamantri ladki bahin yojna2024 : माझी लाडकी बहीण योजना मध्ये झाली मोठे बदल , वयाची अट , डोमासाईल सर्टिफिकेट
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेत खालील बदल करण्यात आले आहेत.
१) मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेच्या मुदतीत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि. ०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
२) आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र (डोमीसाईल) उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशनकार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.
३) रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेत खालील बदल >> येथे क्लिक करा <<