Mukhmantri Ladki Bahi Yojna : लाडक्या बहिणींचे सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे तिन्ही सण पाठोपाठ आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत भाष्य केले होते.
भाऊबीज म्हणून राज्य सरकारतर्फे नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये ऑक्टोबर महिन्यात देण्यात येतील, असे अजित पवार म्हणाले होते. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात लाडक्या बहिणींना एकूण 3000 रुपये मिळणार आहेत.
Mukhmantri Ladki Bahi Yojna : 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांना हे 3000 रुपये मिळणार?
अजित पवार यांनी सांगितल्यानुसार, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींना याच महिन्याच्या 10 तारखेपर्यंत मिळणार आहेत. म्हणजेच साधारण पाच ते सहा दिवसांत लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा व्हायला सुरूवात होईल.
महिलांना आत्तापर्यंत मिळाले तीन हप्त्याचे पैसे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत. आता ऑक्टोबर महिन्यात आगामी दोन हप्यांचे पैसे दिले जातील.
कागदपत्रांची त्रुटी किंवा अन्य कारणामुळे पैसे न मिळालेल्या महिलांना या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये सप्टेंबर महिन्यात देण्यात आले होते. त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याची केवायसी तसेच बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.
हेही वाचा : नवरात्री: देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करावे आणि काय नाही
हेही वाचा : लाडक्या बहिणींना अन्याय! पैसे कापणाऱ्या बँकांवर कारवाईची मागणी
हेही वाचा : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी?
This post was last modified on %s = human-readable time difference 6:05 am