Mukhamantri Teerth darshan Yojna : तीर्थ दर्शन योजनेसाठी शासनाचे आवाहन.

Mukhamantri Teerth darshan Yojna : भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

पात्रतेचे निकष

लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

वय वर्षे 60 व त्यावरील व्यक्ती योजनेचा लाभ घेवू शकतात.

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रूपये 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा.

कुटुंबातील सदस्य नियमित/ कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.

WhatsApp Image 2024 09 11 at 12.04.53 AM

Mukhamantri Teerth darshan Yojna : तथापि, रूपये 2 लाख 50 हजार पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी हे या योजनेसाठी पात्र असतील.

कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य नसावा. चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळता) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावे, लाभार्थी प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा.

योजनेच्या अधिक माहितीसाठी अर्जदारांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन येथे संपर्क साधावा.

हेही वाचा : नोकरीच्या नवीन संधी कशा मिळतात?

हेही वाचा : शासनाकडून 50 हजार योजनादूतांची भरती.

tc
x