X

Mukhamantri Ladki bahin yojna : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, नामंजुर अर्ज आता झटपट मंजूर होणार, या नंबरवर कॉल करा

Mukhamantri Ladki bahin yojna

Mukhamantri Ladki bahin yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अद्याप अनेक महिलांनी घेतला नाही आहे. कागदपत्रांची जुळवाजुवळ, मोबईल नंबरशी आधार लिंक, बँक अकाऊंशी आधार लिंक नसल्या कारणाने हे अर्ज रखडले आहेत. त्यासोबत अर्जाबाबत महिलांमध्ये अजूनही संभ्रम आहेत. हे संभ्रस आता चुटकीसरशी दुर होणार आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ‘महाराष्ट्रवादी’ व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरु केली आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना 9861717171 या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजने संदर्भातल्या त्यांच्या समस्या सांगायच्या आहेत. या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 72 तासांच्या आत संपर्क केला जाईल आणि तुमच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत.

या नंबरवर समस्या कशा सांगायच्या?

● वरील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा.
तुमची भाषा, जिल्हा, मतदारसंघ, लिंग इत्यादी गोष्टी निवडा.

● ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा.

● योजनेबद्दल समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडा.

●समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा.

● यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल.

● यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याशी संपर्क साधेल.

हेही वाचा : 50 हजार भरती

महिलांना तक्रार करता येणार?

माझी लाडकी बहीण योजनेत महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही 181 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकतात आणि आपली तक्रार दाखल करू शकतात. महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार दाखल करता येणार आहे. यानंतरच त्यांच्या तक्रारीचे निवारण होणार आहे.

हेही वाचा तीर्थ दर्शन योजनेसाठी शासनाचे आवाहन..‼️

हेही वाचा नोकरीच्या नवीन संधी कशा मिळतात

This post was last modified on %s = human-readable time difference 7:51 am

Davandi: