निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द झाला आहे.
जाहीरनाम्यात काय आहे?
लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत असून ती रक्कम 1500 वरून आम्ही 2100 रुपये करणार आहोत. 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार रुपये करणार आहोत. कर्जमाफी आणि अतिरिक्त अनुदान आम्ही देणार आहोत. 20 टक्के अधिक अनुदान असेल.
राज्यातील ग्रामीण भागात 45 हजार पानंद रस्ते करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे.
महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे
धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी वरती 20% अनुदान देण्याचा वादा अजित दादांच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे.
वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे.
वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.
दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा करण्यात आलेला आहे.
25 लाख रोजगार निर्मितीचा वादा देखील केला आहे.
कृपया ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा
>>> तुमच्या गावात महा ई सेवा केंद्र सुरू करायचे असा करा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज
>>> दिवाळीमध्ये लाल परीचा प्रवास होणार अजूनच सुखदायक
This post was last modified on November 8, 2024 9:54 am