
Mukhamantri bal ashirwad yojna :
Mukhamantri bal ashirwad yojna : राज्य सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवतात. या योजनांबाबतचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेचा मेसेज व्हायरल होत आहे. या योजनेत मुलांना दर महिन्याला ४००० रुपये दिले जातात, असे सांगितले जातात.परंतु अशी कोणतीही योजना राज्यात राबवण्यात आले नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.अशी कोणतीही योजना महाराष्ट्रात राबवण्यात आलेली नाही. कोणत्याही पोस्टला बळी पडू नका, असं आवाहन करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेच्या नावाने मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये १ मार्च २०२० नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालकांचा मृत्यू झाला असेल तर त्यांना आर्थिक मदत मिळते. अशा मुलांना दर महिन्याला ४००० रुपये दिले जातात.या योजनेसाठी अर्ज कसा करावा, याबाबतचीही माहिती देण्यात आली आहे. हा मेसेज तुफान व्हायरल होत आहे. या योजनेबाबत लोकांनी सरकारी कार्यालयात जाऊन माहितीदेखील विचारली आहे.
Mukhamantri bal ashirwad yojna : महिला व बाल विकास विभागाने याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नाही. या सर्व अफवा आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या.
बाल आशिर्वाद योजना हा महाराष्ट्रात राबवली जात नाहीये. इतर राज्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे. या योजनेत मुलांना दर महिन्याला ४००० रुपये मिळतात. जेणेकरुन त्यांचे पुढचे भविष्य चांगले व्हावे. या योजनेचा मेसेज महाराष्ट्रात व्हायरल होत आहे. मात्र, महाराष्ट्रात अशी कोणतीही योजना राबवलेली नाही.