MSRTC : निवृत्तीनंतर, मृत कर्मचाऱ्याच्या पत्नी किंवा पतीला वयाच्या 75 वर्षापर्यंत पासची सुविधा मिळेल. एसटी महामंडळाने घेतला हे निर्णय
नागपूर : दरवर्षी एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीच्या सामान्य बसमध्ये मोफत प्रवास करण्यासाठी पास मिळतो. आता त्यांना स्लिपर कोच बसमधूनही प्रवास करता येणार आहे. मात्र, त्यासाठी फरकाची रक्कम भरावी लागणार आहे. याशिवाय निवृत्तीनंतर मृत कर्मचाऱ्याच्या पत्नी किंवा पतीला वयाच्या ७५ वर्षापर्यंत पासची सुविधाही मिळणार आहे.
एसटी महामंडळाने हे निर्णय घेतले.दरवर्षी एसटीतून मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी निवृत्त होतात. त्यांना 75 वर्षे वयापर्यंत दरवर्षी जुलै ते फेब्रुवारी दरम्यान एकदा मोफत प्रवासाचा पास मिळतो. यापूर्वी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या पत्नी किंवा पतीला वयाच्या 65 वर्षापर्यंतच पास मिळत असे.
मात्र आता हयात कर्मचाऱ्यांप्रमाणेच मयत कर्मचाऱ्यांच्या पत्नी किंवा पतीलाही वयाच्या ७५ वर्षापर्यंत पास मिळणार आहे. पूर्वी फक्त सामान्य बसमधून एसटी पासवर प्रवास करता येत होता.
वर्षभराचा पास द्या >>>अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा <<