MSRTC BUS LOCATION : बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आपली बस केव्हा येणार हाच एक प्रश्न सतावत असतो. आता प्रवाशांची ही चिंता दूर झाली आहे. त्यांना हवी असलेली बस कुठे आहे, किती वेळात स्थानकावर येणार यासह अनेक प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर मिळणार आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीकरिता ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम’ ‘एमएसआरटीसी कॉम्प्युटर’ हे नवीन अॅप तयार केले असून, रेल्वे विभागाच्या माहितीप्रमाणे एसटी महामंडळ प्रवाशांची माहिती उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांची चांगलीच सोय होणार आहे. बस कुठे आहे ते आता त्यांना घरीबसल्या कळणार आहे.
>>>> काय आहे अँप ?