🔸 यूपीएससी 2022 परीक्षेचा निकाल जाहीर,यंदाच्या परीक्षेत मुलींचा डंका; इशिता किशोर देशात पहिली तर ठाण्याची काश्मिरा संखे या परीक्षेत राज्यात पहिली.
🔸 शैक्षणिक वर्षापासून सरकारी शाळांमध्ये ‘एक राज्य एक गणवेश योजना’ लागू होणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती.
🔸विश्वचषक पात्रता फेरीचे वेळापत्रक जाहीर, मुख्य स्पर्धा 18 जूनपासून होणार सुरु
🔸दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबई दाखल; आज उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
🔸एकतरी महिला ‘बालविकास मंत्री’ हवी, अशी माझी सरकारला विनंती आहे – रूपाली चाकणकर
🔸 रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ऑनलाईन होलसेल स्वरूपातील जिओ मार्टमध्ये मोठी नोकर कपात करण्यात आली आहे – कंपनीने 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याची घोषणा केली आहे.
🔸 ऑस्ट्रेलियाचे फॉरेन असिस्टंट मिनिस्टर टीम वॅट्स यांनी नुकतीच नेपाळच्या पशुपथीनाथ मंदिराला भेट दिली, त्या दरम्यान त्यांनी एक ट्वीट करून “हिंदू धर्म ऑस्ट्रेलियामधील सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे.”
🔸 असे विधान करत ऑस्ट्रेलियात हिंदू धर्माचा प्रभाव वाढत असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले. 30 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात जेवढी हिंदूंची संख्या होती त्याच्या वीस पट संख्या आज वाढली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
🔸 ओला कंपनी आपली Ola S1 Air स्कूटर जुलैमध्ये सादर करणार अशी माहिती कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर या इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझर जारी करतांना दिली.
🔸 लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अँप WhatsApp मध्ये आता मेसेज एडिट करता येणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गने याबाबत एक मोठी घोषणा केली आहे.
🔸 मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘आता तुम्ही 15 मिनिटांसाठी WhatsApp वर पाठवलेले मेसेज एडिट करू शकणार आहात’. मेसेज प्रेस एंड होल्ड केल्यानंतर एडिटचा पर्याय दिसेल जिथून तुम्ही मेसेज एडिट करू शकता.
🔸 मोठी बातमी ! मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 61100 रुपये प्रति तोळा आहे, तर चांदी 74,500 रुपये प्रति किलो झाली आहे.
🔸निवड:डॉ. मुरहरी केळे मुख्य अभियंतापदी रुजू; तालेवार यांची मध्य प्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीच्या संचालकपदी निवड
🔸मुंबईत कोरोनाचे 16 रुग्ण, चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
🔸जी-२० – आपत्ती जोखीम कमी करण्याच्या कार्यगटाची बैठक आजपासून मुंबईत
🔸 पंतप्रधान मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज शेवटचा दिवस, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार.
🔸अफवा पसरवून राज्यात दंगलीस चिथावणी देणाऱ्या आशिष शेलारांना अटक करा, काँग्रेसची मागणी
🔸’स्टॅम्प पेपरवर लिहून देतो महाविकास आघाडी एकत्र राहणार’, अजित पवारांचा मुंबईत मोठा दावा
🔸तपास यंत्रणांचा गैरवापर करून गलिच्छ राजकारण करणे दुर्दैवी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका
🔸शैक्षणिक वर्षापासून ‘एक राज्य एक गणवेश योजना’ लागू होणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
🔸केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 वर्षाचा निकाल जाहीर, यंदाच्या यूपीएससी परीक्षेत मुलींचा डंका
🔸राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोठा झटका! केरळमध्ये 1200 मंदिरांमध्ये शाखा घेण्यावर बंदी; त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचा निर्णय
🔸अयोध्येच्या राम मंदिराचं काम वेगाने सुरु, 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार पहिला टप्पा, बांधकाम समितीच्या अध्यक्षांची माहिती
🔸न्यायालयाच्या तारखांपेक्षा मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा जास्त झाल्या, बच्चू कडू यांचा खोचक टोला
🔸यंदाच्या आषाढी वारीत ‘हरित वारी स्वच्छ वारी’चे नियोजन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती
🔸महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, हास्यजत्रेऐवजी ‘कोण होणार करोडपती’ सुरु होणार
🔸 नऊ तासांच्या ईडी चौकशीनंतर सगळ्यांचे फोन आले, पण अजित दादांचाच फोन आला नाही, खुद्द जयंत पाटलांची माहिती.
🔸 महाराष्ट्रासाठी घातवार! बुलढाण्यात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जण ठार; अमरावतीत एकाच कुटुंबातील 5 जण दगावले.
🔸 राहुल गांधींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणारा ट्वीट; व्हिडीओ डीलीट करुन महाराष्ट्राची माफी मागा, भाजपची मागणी.
🔸 IPL 2023 : चेन्नईचा गुजरातवर 15 धावा राखून विजय; या विजयासह चेन्नईची फायनलमध्ये धडक.