WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

● राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी.

▪️आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनचा वापर वाढला; मे महिन्यात 10.7 दशलक्ष व्यवहारांची नोंद

▪️ राष्ट्रीय पुरुष आयोगाच्या स्थापनेबाबत सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

▪️ खरेदीचा उत्सव पुन्हा एकदा, अॅमेझॉनवर 15 आणि 16 जुलै रोजी ‘प्राइम डे’

▪️यापुढे पंचायत कामांसाठी डिजिटल पेमेंट अनिवार्य होणार

▪️तमिळनाडूच्या राज्यपालांकडून ऊर्जामंत्री सेंथील बालाजींचं मंत्रीपद रद्द, कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी कारवाई

▪️ देवेंद्र फडणवीस यांनी इतर वक्तव्य करण्यापेक्षा महिला संरक्षणाचे उपाय करावे – शरद पवार

▪️ खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर जाण्यास मनाई; कलम 144 लागू

▪️ ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन

● जगात मत्स्योत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक, तर जागतिक उत्पादनात आठ टक्के वाटा : मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची माहिती.

● गेल्या सहा महिन्यात 4,434 मुली बेपत्ता, सत्ताधाऱ्यांनी बाष्कळ वक्तव्ये न करता महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं; शरद पवारांचा हल्लाबोल.

● पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव, त्यांनी आमचा डबलगेम केला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आरोप.

● समान नागरी कायद्यावर शीख, जैन आणि पारशी समुदायाचं मत लक्षात घ्यावं, मग आम्ही भूमिका मांडू: शरद पवार.

▪️ मोठी बातमी ! राज्यात ९ नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देणार अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे.

▪️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्या अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

▪️ प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया गुजरातमध्ये नवीन पर्सनल हेल्थ केअर मॅन्युफॅक्चरिंग सुविधा उभारण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारतातील त्यांचा हा नववा प्लांट असेल.

▪️या ठिकाणी एरियल, जिलेट, हेड अँड शोल्डर्स, ओरल बी, पॅम्पर्स, पॅन्टिन, टाईड, विक्स आणि व्हिस्पर सारखे लोकप्रिय ब्रँड तयार केले जातील.

▪️ अंतिम निर्णय येईपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्हे औरंगाबाद हे जुनेच नाव वापरणार अशी हमी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे.

▪️ देशातील सर्वात मोठी एअरलाईन्स कंपनी इंडिगोचे ​​बाजार भांडवल २८ जून रोजी १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे – हा आकडा पार करणारी इंडिगो ही देशातील पहिली विमान कंपनी आहे.

● विठुरायाच्या दर्शन रांगेत अभूतपूर्व गोंधळ; शासकीय महापूजेनंतरही दर्शन रांग वेगाने पुढे सरकत नसल्याने भाविक आक्रमक, मंदिर समिती मुर्दाबादच्या घोषणा.

● ईदच्याच दिवशी सोलापुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न? ईदगाहच्या समोर ‘लव्ह पाकिस्तान’ संदेश असलेल्या फुग्यांची विक्री.

● तामिळनाडूच्या राज्यपालांनी सेंथील बालाजी यांना मंत्रिमंडळातून हटवले; मुख्यमंत्री स्टॅलिन आक्रमक.

● उच्च शिक्षण संस्थामधील प्रवेशांसाठी असलेले आरक्षण रद्द ; अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय.

tc
x