● राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा; विदर्भात यलो अलर्ट तर कोकणातही जोर वाढणार; हवामान खात्याचा अंदाज.
● उत्तरेकडील राज्यांमध्ये पूरस्थिती कायम, हिमाचल प्रदेशचं 8000 कोटींचं नुकसान; आजही मुसळधार पावसाचा इशारा.
● मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड; राहत्या घरात सापडला मृतदेह.
● मुंबईत लवकरच IIM सुरू होणार, पवईतील NIIE संस्थेत आयआयएम सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
● नाशिक जिल्ह्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही; नाशिकमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही.
● जे घरी बसून काम करतात, त्यांना जनता घरीच बसवते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर घणाघात.
● अहमदनगरमध्ये बनावट पदवी देणारे रॅकेट उघड, फोनमुळे झाला उलगडा; दिल्लीपर्यंत कनेक्शन.
● दहशतवादविरोधी लढाईत भारत आणि फ्रान्स एकत्र, पॅरिसमधून पंतप्रधान मोदींचा दहशतवादावर हल्लाबोल.
● चिनी ड्रॅगन अन् पाकिस्तानची झोप उडणार; भारताच्या नौदलात सामील होणार 26 राफेल-एम.
● खून, अपहरण, अतिप्रसंग… देशातील 44 टक्के आमदारांवर गुन्हे, महाराष्ट्रातील 114 आमदारांवर गंभीर गुन्हे: ADR च्या अहवालातून धक्कादाक माहिती समोर.
▪️ महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प औपचारिकपणे अदानी समूहाच्या कंपनीकडे सोपवला आहे. या प्रकल्पांतर्गत, २०,००० कोटी रुपये खर्चून मध्य मुंबईतील २५९ हेक्टर वरील धारावी झोपडपट्टीचे पुनर्वसन केले जाणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अदानी प्रॉपर्टीजने या योजनेसाठी स्पर्धात्मक बोली जिंकली होती.
▪️ भारतात टेस्ला कधी येणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती आता ती गोष्ट लवकरच होणार असल्याची शक्यता आहे. कारण इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात कार निर्मिती करण्यास सज्ज झाली आहे. यासाठी इलॉन मस्क यांची केंद्र सरकारशी चर्चा देखील सुरु आहे. जर भारतात टेस्ला कारची निर्मिती झाली तर या कारची किंमत 20 लाखांपासून सुरु होईल असे सांगण्यात आले आहे.
▪️ जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनची किंमत यावर्षी 50 हजार डॉलरच्या पातळीपर्यंत पोहोचू शकते. त्याचप्रमाणे, बिटकॉइनची किंमत पुढील वर्षाच्या अखेरीस – म्हणजेच 2024 पर्यंत 1.20 लाख डॉलरच्या पातळीवर पोहोचू शकते असा अंदाज ब्रोकरेज फर्म स्टँडर्ड चार्टर्डने व्यक्त केला आहे.
▪️ देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयनं आपल्या कर्जदारांना मोठा धक्का दिला आहे. SBI नं MCLR रेट मध्ये मोठी वाढ केली आहे. दरम्यान याचा तुमच्या ईएमआयवर काय परिणाम होईल हे आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ.