UPI अकाऊंट म्हणेच फोन पे, Gpay किंवा Paytm अश्या कोणत्याही ॲप वर आपण पैसे ट्रान्स्फर करत असाल आणि नंबर चुकला आणि दुसऱ्याच्याच अकाऊंट मध्ये पैसे गेले तर मग ? काय करायचं ?
पैसे गेले का ?
आता घाबरु नका आणि पैसे गेले म्हणून रडतही बसू नका
हे पैसे आपण परत मिळवू शकतो ते कसे काय ?
- सर्वप्रथम NPCI च्या वेबसाईट ला भेट द्या ही सरकार ची UPI साठीची ऑफिशीयल वेबसाईट आहे.
- या वेबसाईटला गेल्यावर ‘गेट इन टच’ या ऑप्शन वर क्लिक करा.
- इथे दुसरा ऑप्शन येईल UPI complaint त्या वर क्लिक करा आणि नंतर खालील दिलेल्या स्क्रीन नुसार
- पहिला Transaction हा पर्याय निवडा
- तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल त्यामध्ये तुम्हाला काही बेसिक माहिती आणि Transaction ची माहिती टाकावी लागेल.
- खालील दिलेल्या माहितीपैकी योग्य पर्याय निवडा आणि नंतरच माहिती भरा.
- नंतर फॉर्म सबमिट करा, ही प्रक्रिया झाली की तुमची कम्प्लेंट रजिस्टर झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल.
सोबतच तुम्ही ज्या ॲप वरून ट्रांसॅक्शन करताय त्या ॲप च्या कस्टमर केअर किंवा कम्प्लेंट सेक्शन मध्ये तुमची तक्रार नोंदवा.
NPCI दोन्ही बँकेशी बोलून तुमचे पैसे ७ दिवसांच्या आत परत तुमच्या अकाऊंटला जमा करते.
जर रक्कम मोठी असेल तर बँकेत सुधा तक्रार नोंदवा, आणि जर बँक तुमची तक्रार घेत नसेल किंवा ३० दिवसाच्या आत काही उत्तर देत नसेल तर तुम्ही
बँकिंग लोकपाल/Banking Ombudsman ला तक्रार करू शकता आरबीआयच्या म्हणण्यानुसार, एखादी व्यक्ती एका साध्या कागदावर लिहून लोकपालाकडे तक्रार नोंदवू शकते
हे ही वाचा : – Latest : 15 ऑगस्टपासून सर्व सरकारी रुग्णालयांत मोफत उपचार !!
आणि पोस्ट/फॅक्स/हँड डिलिव्हरीने लोकपालच्या संबंधित कार्यालयाकडे पाठवू शकते. किंवा ऑनलाईन सुधा तक्रार नोंदवू शकता.
मग आता काळजी करून फक्त हातावर हात ठेऊन बसू नका लगेच तक्रार नोंदवा आणि आपले पैसे परत मिळवा.
This post was last modified on August 8, 2023 9:03 am