Mohan Bhagvat : देशात लोकांची मते वेगवेगळी आहेत, देवासाठी आपण सर्व एक आहोत. जाती देवांनी नाही तर…..

Mohan Bhagvat : जाती देवांनी बनवलेल्या नसून त्या जाती पंडितांनी बनवलेल्या आहेत. आपण देवासाठी सर्वजण एक आहोत आपल्या देशाला वाटून घेण्यासाठी पहिल्यांदा आक्रमण झाली , यानंतर बाहेरून आलेल्या लोकांनी याचा फायदा घेतला , असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले .संत शिरोमणी रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते .

आपल्या समाजात फूट पाडून बाहेरील लोकांनी नेहमीच फायदा घेतला आहे वर्षानुवर्षे आक्रमणे झाली आणि आमच्यात फूट पडून बाहेरच्या लोकांनी फायदा घेतला. तशी आमच्याकडे बघायची देखील कोणाची हिम्मत नव्हती अशातच समाजातील आपुलकी संपली की स्वार्थ आपोआप मोठा होतो. असंही ते म्हणाले .
देशात हिंदू धर्म संपण्याची तुम्हाला जर भीती असेल तर हे तुम्हाला कोणताही ब्राह्मण नाही सांगू शकत आणि आपली उपजीविका म्हणजे समाजप्रती असणारी जबाबदारी आहे. आपण केलेलं प्रत्येक काम समाजासाठी असते तर मग कोणी उच्च नीच वेगळे कसे असतील?

Mohan Bhagvat : देशात लोकांची मते वेगवेगळी आहेत विवेक आणि चैतन्य यात मात्र फरक नाही. आम्ही धर्म बदलण्याचा प्रयत्न केलेला नाही.आपण धर्म बदलला तर परिस्थिती कशी बदलायची हे आंबेडकरांनी सांगितलं आहे. असेही ते म्हणाले.

तुमच्यावर कोणतीही परिस्थिती येऊद्या तुमचा धर्म सोडू नका .रोहिदासांबरोबर सगळ्याच विचारवंतांनी हेच सांगितलंय की नेहमी धर्माशी जोडले जा. हिंदु मुस्लिम सगळे एक आहेत . असंही ते यावेळी म्हणाले .

tc
x