X

मनसेच्या अणुशक्ती नगर विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

वार्ताहर : संतोष शिंदे मुंबई-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अणुशक्ती नगर विधानसभेतील कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या विविध कार्यक्षेत्रातील वर्ष २०२३ या एक वर्षाच्या कालावधीकरिता नवीन नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

यामध्ये सचिन ससाने (प्रभाग क्रमांक -१४१ ,१४३), राजेश पुरभे (प्रभाग क्रमांक- १४६,१४७,१४८), विशाल कदम यांची (प्रभाग क्रमांक-१४४,१४५) च्या उपविभाग अध्यक्षपदी तर पवन पवार (प्रभाग क्रमांक- १४४), मदन गाडेकर( प्रभाग क्रमांक-१४६ ) ,संदीप बनसोडे(प्रभाग क्रमांक-१४१) च्या शाखा अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

तसेच जगन्नाथ आंब्रुळकर (प्रभाग क्रमांक १४३,१४४), आनेश कदम (प्रभाग क्रमांक-१४६,१४७)च्या उपविभाग सचिव पदी तर देवेंद्र पंडित (प्रभाग क्रमांक-१४६), प्रसाद सनगोर (प्रभाग क्रमांक – १४४), अविनाश नटे(प्रभाग क्रमांक-१४३)च्या शाखा सचिव पदी नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे.

या सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अणुशक्ती नगर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून त्यांना पुढील राजकीय कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

This post was last modified on %s = human-readable time difference 11:29 am

Davandi: