X

Ministry Of Defence Recruitment 2023: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,दहावी आणि ITI पास असणाऱ्यांसाठी १७९३ पदांची बंपर भरती

Ministry Of Defence Recruitment 2023 : मिनिस्ट्री ऑफ डिफेंसमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे. डिफेंस मिनिस्ट्रीने ट्रेडमॅन आणि फायरमॅन पदांसाठी भरती काढली आहे. या भरती अभियानाद्वारे १७९३ जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया जारी करण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवार असणाऱ्या नी ऑफिशियल वेबसाईट aocrecuritment.govt.in वर जाऊन अर्ज करु शकता. या पदांसाठी अर्ज करण्याआधी पहिल्यांदा कॅंडिडेट्स भरती नोटिफिकेशनला नीट समजून घ्या.

या भरतीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया संपण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२३ आहे. डिफेंस मिनिस्ट्रीत या भरती प्रकियानुसार एकूण १७,९३ पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये ट्रेड्समनच्या एकूण १२४९ पदांसाठी आणि फायरमॅनच्या ५४४ पदांसाठी नियुक्ती केली जाईल.

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता
मिनिस्ट्री ऑफ डिफेंसच्या या भरतीनुसार ट्रेडमॅन पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यता प्राप्त संस्थेकडून १० वी पासचं सर्टिफिकेट असलं पाहिजे.

याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआयचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.

तसेच फायरमन पदांसाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यता प्राप्त संस्थेकडून १० वी पास सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती आहे?

या पदांसाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षामध्ये असलं पाहिजे. तसेच आरक्षण वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

वेतन किती मिळणार?

या भरतीनुसार ट्रेडमॅन पदांसाठी निवड केलेल्या उमेदवारांना १८००० ते ५६९०० रुपयांपर्यंत (पे लेवल १ नुसार) वेतन दिले जाईल. तर, फायरमॅन पदासाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवारांना वेतन म्हणून १९९०० – ६३,२०० रुपये (पे लेवल २ नुसार) देण्यात येतील.

This post was last modified on %s = human-readable time difference 8:02 am

Tags: DEFENCE
Davandi: