Medicines fail : आपण जी औषधे घेता, ती सुरक्षित आहेत का? 49 औषधे फेल केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने काही औषधांची तपासणी केली. यात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गुणवत्ता चाचणीत काही औषधे ही फेल ठरली आहेत. यात व्हिटॅमिन डी 3 250 आययू टॅब्लेट आयपी, लोपेरामाइड हायड्रोक्लोराइड गोळ्या, ग्लिमेपिराइड टॅब्लेट, पॅरासिटामॉल, पीडियाट्रिक ओरल सस्पेंशन आयपी टॅब्लेट आणि कॅल्शियम, अँटासिडसह 49 औषधांचा समावेश आहे.
▪️पुण्यातील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड पिंपरीपासून तयार करण्यात आलेली मेट्रोनिडाझोल याशिवाय डोम्पेरिडोन, ऑक्सिटोसिन इंजेक्शन, निमेसुलाइड आणि पॅरासिटामॉल गोळ्या, कॅल्शियम 500 मिलीग्राम आणि व्हिटॅमिन डी 3 250 आययू टॅब्लेट आयपी, लोपेरामाइड हायड्रोक्लोराइड गोळ्या, ग्लिमेपिराइड टॅब्लेट, पॅरासिटामॉल पेडियाट्रिक ओरल सस्पेंशन आयपी टॅब्लेट आणि इतर अनेक औषधांचा या यादीत समावेश आहे.
▪️सीडीएससीओ यादीतील इतर औषधांमध्ये पिपरासिलिन आणि टॅझोबॅक्टॅम इंजेक्शन, मेथिलकोबालामिन इंजेक्शन 2500 एमसीजी, डेक्सट्रोमेथॉर्फन ए हायड्रोब्रोमाइड, क्लोरफेनिरामाइन ई मॅलेट आणि फेनिलेफ्रिन हायड्रोक्लोराइड सिरप यांचा समावेश आहे. याशिवाय सेटिरिझिन डायहायड्रोक्लोराईड सिरप हे देखील गुणवत्ता यादीत फेल ठरलेल्या औषधांच्या यादीत आहे.
>>> मतदार ओळखपत्र नाही हे १२ पुरावेही ग्राह्य!
>>> पेट्रोल पंपावर हे पण चेक करा , फसवणूक झाली तर
>>> रागाचा झटका येतो