Mahayuti Cabinet Expasion : अखेर महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर! कोणाला कोणतं खातं मिळालं?

Mahayuti Cabinet Expasion : अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यानंतर अवघ्या राज्याचं लक्ष खाते वाटपाकडे लागलं होतं. मात्र आता अखेर खाते वाटप जाहीर झालं आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं. तर आता पाहुयात कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालं आहे.

कॅबिनेट मंत्र्यांमध्ये कोणाला कोणतं खातं मिळालं?:

मुख्यमंत्री फडवणीस पाच खात्यांचे मंत्री

▪️ देवेंद्र फडणवीस – गृह मंत्री, ऊर्जामंत्री, कायदामंत्री , माहिती प्रसिद्धीमंत्री आणि न्यायव्यवस्थामंत्री

उपमुख्यमंत्री
▪️ एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण , सामान्य बांधकाम

▪️ अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन

Mahayuti Cabinet Expasion : इतर नेत्यांना कोण कोणती खाती मिळाली ते पाहूया


▪️ चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
▪️ राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
▪️ हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
▪️ चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
▪️ गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
▪️ गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा आणि स्वच्छता
▪️ गणेश नाईक – वनमंत्री
▪️ दादा भुसे – शालेय शिक्षण
▪️ संजय राठोड – जलसंधारण
▪️ धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा
▪️ मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास
▪️ उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा
▪️ जयकुमार रावल – मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
▪️ पंकजा मुंडे – पर्यावरण आणि हवामान बदल, पशुपालन
▪️ अतुल सावे – ओबीसी, डेअरी विकास आणि अक्षय ऊर्जा
▪️ अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
▪️ शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
▪️ आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
▪️ दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
▪️ अदिती तटकरे – महिला व बालविकास
▪️ शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
▪️माणिकराव कोकाटे – कृषी
▪️ जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
▪️ नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
▪️ संजय सावकारे – कापड
▪️ संजय शिरसाट – सामाजिक न्याय
▪️ प्रताप सरनाईक – वाहतूक
▪️ भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
▪️ मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
▪️ नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
▪️आकाश फुंडकर – कामगार
▪️ बाबासाहेब पाटील – सहकार
▪️ प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

Mahayuti Cabinet Expasion : राज्यमंत्र्यांमध्ये कोणाला कोणतं खातं मिळालं? :

▪️ आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार
▪️ माधुरी मिसाळ – शहर विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
▪️ पंकज भोयर – म्हाडा
▪️ मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
▪️ इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
▪️ योगेश कदम – ग्रामविकास, पंचायत राज

Mahayuti Cabinet Expasion :

tc
x