Maharashtra Budget 2023-2024 Live: देवेंद्र फडणवीसांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात नेमक्या कोण कोणत्या तरतुदी नमूद केल्यात ? वाचा सविस्तर!

Maharashtra Budget 2023-2024 Live Updates: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ लाईव्ह अपडेट.

09 March 2023: सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. मात्र, आज एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या घोषणा करणार याची जोरदार चर्चा रंगली होती.

शिवाय, राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने नुकसान भरपाईचीही मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती

Maharashtra Budget 2023-2024: कर्जबाजारी होण्याच्या दिशेनं राज्याची वाटचाल – अजित पवार
जरा दोन दिवस थांबा.. मी अर्थसंकल्पावर आमची भूमिका मांडणारच आहे. राज्याची सध्याची परिस्थिती पाहाता राज्य कर्जबाजारी होण्याकडे चाललंय. साडे सहा लाख कोटींवर कर्जाचा आकडा गेला आहे – अजित पवार

Maharashtra Budget 2023-2024: भरीव तरतूद म्हणजे नेमकं काय?
महापुरुषांच्या स्मारकांना निधीची घोषणा केली. पण ठोस किती निधी देणार याची काही घोषणा केलेली नाही. अनेक महामंडळांचा विकास करण्याच्या घोषणा केल्या. भरीव तरतुदीची घोषणा केली. पण म्हणजे नेमकं काय? – अजित पवार

Maharashtra Budget 2023-2024:
अर्थसंकल्पातला निधी फक्त ५१ टक्के झालाय. अजून २० दिवसंमध्ये फारतर २० टक्के खर्च होईल. तरी ३० टक्के खर्च होणारच नाहीये. त्यामुळे फक्त घोषणा करायच्या अशी ही परिस्थिती आहे. जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला – अजित पवार

https://twitter.com/pallavict/status/1633764930850807808?s=20

Maharashtra Budget 2023-2024: विकास खर्च फक्त ३५ टक्के झालाय – अजित पवार
आज मी सकाळचे आकडे घेतले. आपल्या डीपीसीचा खर्च फक्त ३५ टक्के झालाय. या महिन्यातले २१-२२ दिवसच राहिलेत. काही जिल्ह्यात तर ४ टक्के, ५ टक्के असा खर्च झालाय – अजित पवार

Maharashtra Budget 2023-2024: अजित पवारांची अर्थसंकल्पावर टीका
सरकारनं गेल्या ८-९ महिन्यात केलेल्या घोषणांचीच पुनरावृत्ती या अर्थसंकल्पात करण्यात आली. गेल्या अर्थसंकल्पात आम्ही विकासाची पंचसूत्री आणली होती. यांनी विकासाचं पंचामृत आणलं आहे. अमृताप्रमाणेच विकासाचं पंचामृतही कुठे दिसणार नाही – अजित पवार

महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क
– वस्तु व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना-2023 जाहीर

– ही नवीन अभय योजना 1 मे 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत

– दि. 1 मे 2023 रोजी प्रलंबित थकबाकीसाठी योजना लागू

– कोणत्याही वर्षासाठी, व्यापार्‍याची थकबाकी 2 लाखांपर्यंत असल्यास ती रक्कम पूर्णपणे माफ, 1 लाख लहान व्यापार्‍यांना लाभ

– कोणत्याही वैधानिक आदेशानुसार, थकबाकी 50 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा प्रकरणात एकूण थकबाकीच्या 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 80 टक्के रक्कम माफ, सुमारे 80,000 मध्यम व्यापार्‍यांना लाभ

शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ
– प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये

– माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये

– उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये

– पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023-2024: विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ
विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत

– 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये

– 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये

– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार

Maharashtra Budget 2023-2024: विमानतळांचा विकास…
– शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी

– छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी

– नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार

– पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ

– नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी

– बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे

tc
x