Maharashtra Budget 2023 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘ही’ एक मोठी आनंदाची बातमी शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

शेतकर्‍यां साठी सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे ती खालील प्रमाणे

“‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ जाहीर केली ”

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. यानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून दरवर्षी मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या मदतीत राज्य सरकारही ६ हजार रुपयांची भर घालून ही रक्कम देणार आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज हवामान बदल, अवकाळी पाऊस, अवर्षण अशा असंख्या समस्यांनी अन्नदाता ग्रासला आहे. शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले, तरी त्याला हक्काच्या मदतीची गरज आहे. कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचीच आमची भूमिका आहे. यावर्षी अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल.”

“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ जाहीर केली ”

“अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकारलेला प्रधानमंत्री कृषीसन्मान निधी योजनेत राज्य सरकारच्या अनुदानाची भर घालण्यात येईल.

त्यानुसार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ आम्ही जाहीर करत आहोत. या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी ६ हजार रुपयांमध्ये राज्य सरकार आणखी ६ हजार रुपयांची भर घालेल,” अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली.

“राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये मिळतील”
“त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये मिळतील. याचा लाभ १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना होणार आहे. त्यासाठी २०२३-२४ साठी ६ हजार ९०० कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद केली जाईल,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

ब्रेकिंग ! अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना आता पीएम किसानप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पण लाभ, 6 हजार अधिक निधी

Maharashtra Budget 2023 : राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठी भेट दिली आहे. विधानमंडळात आज अर्थसंकल्प मांडला जात असून या अर्थसंकल्पमध्ये राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धरतीवर एका मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे.

या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. देशभरातील जवळपास आठ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. राज्यातही ही योजना कार्यान्वित असून राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होत आहे. एका आकडेवारीनुसार राज्यातील जवळपास एक कोटी शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळत आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने वितरित केले जातात. दरम्यान, आता याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील एक योजना सुरु होणार आहे. नुकतीच अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा केली आहे.

या योजनेअंतर्गत आता राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जाईल असं सांगितलं जात आहे. निश्चितच पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6000 रुपयाचा लाभ सध्या स्थितीला राज्यातील शेतकऱ्यांना मिळतच आहे आता त्याच धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना शिंदे फडणवीस सरकार सुरू करणार आहे.

याची घोषणा अर्थसंकल्पात झाली असून याबाबत लवकरच सर्व निकष आणि पात्रता याबाबतची माहिती समोर येणार आहे. निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी असून यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा अधिक लाभ मिळणार आहे हे नक्की.

tc
x