Maharashtra Bal Sangopan Yojana 2023 : मुलांसाठी महाराष्ट्र सरकारची अप्रतिम योजना ‘ हा’ एक अर्ज करा अनं महिन्याला मिळवा 2250 रुपये

मोदी सरकार देशात अनेक नवनवीन योजना राबवल्या आहेत .

अशा वेळी आता महाराष्ट्र सरकारने मुलांसाठी एक खास योजना राबवली आहे. यातून तुम्ही महिन्याला 2250 रुपये मिळवू शकता.
त्या पैकी बाल संगोपन योजना आहे .

Bal Sangopan Yojana Maharashtra 2023 : बाल संगोपन योजनेचा लाभ 58 हजार पेक्षा जास्त लाभार्थी घेत आहेत. तसेच बऱ्याच लोकांना या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत.
आपण आज या योजनेची माहिती घेऊया

आज आम्ही तुम्हाला या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळवायचा? या योजनेसाठी अर्ज कधी आणि कुठे करायचा? आणि हा अर्ज केल्यानंतर आपल्याला किती दिवसांनी या योजनेचा लाभ मिळतो, आणि या योजनेचा लाभ कोणकोणाला मिळू शकतो.

तसेच या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रे लागतात, त्याच बरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे. याची सर्व माहिती देणार आहे.

यामुळे तुम्हाला या योजनेची माहिती मिळेल. तसेच या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिक लाभ घेऊ शकतील. त्या अगोदर आपण ही बाल संगोपन योजना नेमकी काय आहे ते जाणून घेऊ.

ही योजना वर्ष 2005 मध्ये केंद्र शासन व राज्य शासनाच्या अंतर्गत बाल संगोपन योजना सुरू करण्यात आली. मात्र ही योजना पुर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या निधीतून राबवली जाते, व फक्त महाराष्ट्र राज्यातील असणारे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

इतर राज्यातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

बाल संगोपन योजना ही महिला व बाल विकास विभागाच्या मार्फत राबविली जाते. तसेच या योजनेंतर्गत दर महिन्याला 2250 रुपये आर्थिक मदत लाभार्थ्यांच्या बॅंक अकाऊंटवर जमा करण्यात येते.

अगोदर अनुदानाची रक्कम ही 1100 रुपये प्रतिमाह होती. मात्र आता या रक्कमेमध्ये वाढ करण्यात आली आहे.आता ही रक्कम 2250 रुपये प्रतिमाह लाभार्थ्यांना देण्यात येते.

लाभार्थी अनुदान

1150 वरुन 2500(पालक) तसेच ₹1100 ऐवजी ₹2250/ संस्था साठी
₹125 वरुन ₹250 या प्रकारे बाल संगोपन सहाय्यक अनुदानात 1150 वरुन 2250 एवढी वाढ केली आहे.
बालसंगोपन बाबतीत हा निर्णय 31 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आला आहे.
त्याच बरोबर शासन निर्णय 17 फेब्रुवारी 2023 रोजी काढण्यात आला आहे.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात?

  • या योजनेचा लाभ निराधार आणि गरजू बालक ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील असे मुल घेऊ शकतात.
    ज्या मुलांना आई आणि वडील दोन्ही नसतील असे मुल घेऊ शकतात.
    कोरोनाच्या काळात पालक गमावलेले बालके या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • जे पालक आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी असमर्थ असतील अशी मुल या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • मतिमंद असणारी मुल,अपंग मुल तसेच पालक अपंग आहेत असे मुलं.
    एड्सग्रस्त पालकांचे मुलं.
  • ज्या बालकांचे आई-वडील गंभीर आजाराने हॉस्पिटल मध्ये दाखल असतील ती मुलं.
    ज्या मुलांचे पालक मानसिक रुग्ण आहेत अशी मुलं.
    ज्या मुलांचे आई-वडील घटस्फोटीत आहेत ती मुलं.
    ज्या मुलांच्या आई वडिलांचा पत्ता लागत नाही अशी मुलं.
  • दत्तक देणे शक्य होत नाही अशी मुलं या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
    अशी बालके, ज्या मुलांना कुष्ठरोग झाला आहे अशी बालके इ.प्रकारची मुले या बाल संगोपन(Bal Sangopan) या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून पात्र मुलांना एका मुलासाठी महिन्याला 2250 रुपये मिळतात.

अशा प्रकारे एका वर्षात 27 हजार रुपये मिळतात.
हे पैसे वय 18 पूर्ण होईपर्यंत मुलांना मिळतात.

बाल संगोपन या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र ठरते?
1) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे गरजेचे आहे.
2) लाभार्थी मुलाचे वय हे 0 ते 18 वर्षाच्या दरम्यान असावे.
3) अर्जदार या योजनेच्या नियम आणि अटी यामध्ये बसला पाहिजे.
4) एका कुटुंबातील असणाऱ्या दोन किंवा जास्त मुलांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येतो.

बाल संगोपन या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत –

1) बाल संगोपन योजनेसाठी करायचा अर्ज चा नमुना .

2) अर्ज करणाऱ्या मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट/ जन्म दाखला

3) मुलांचे आधार कार्ड

4) उत्पन्नाचा दाखला

5) अर्जदाराच्या पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र

6)अर्जदाराच्या पालकांचा रहवासी दाखला

7) मुलांचे बँक पासबुकच

8)पालकांच्या मृत्यूचा अहवाल

9) राशन कार्ड

10)राहत असलेल्या घरासमोर पालकांसोबत मुलांचे फोटो (size 4+6)

11)मुलांचे दोन फोटो

12)पालकांची पासपोर्ट साईज फोटो

वरील सर्व कागदपत्रे बाल संगोपन या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी गरजेची आहेत.

बाल संगोपन या योजनेचा अर्ज भरून झाल्यानंतर ही सर्व कागदपत्रे आपल्याला अर्जासोबत जोडावी लागतात. त्यांनतर हा अर्ज मंजूरीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बालकल्याण समितीकडे पाठवण्यात येतो. अर्ज तपासून ती समिती अर्ज मंजूर करते.

आपल्याला बाल संगोपन योजनेची माहितीसाठी तसेच फॉर्म जमा करण्यासाठी तालुका पंचायत समिती ऑफिसमध्ये बाल संरक्षण अधिकारी यांना भेटावे लागते. अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास अधिकारी कार्यालय या विभागात भेट द्यावी लागते. अशा पद्धतीने आपण या बाल संगोपन योजना चा लाभ घेऊ शकता.

tc
x