Maharashtra Assembly Budget 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला असून या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले असून आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार पात्र कुटुंबांना आता वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत.
Maharashtra Assembly Budget 2024- अजित पवार काय म्हणाले?
स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे इंधन आणि महिलांचे आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. महिलांच्या आरोग्यासंबंधीच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे ही आपली जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत एलपीजी गॅसचा वापर हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. म्हणूनच आम्ही त्याचा वापर वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. अजित पवार म्हणाले, “पात्र कुटुंबांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्यासाठी मी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करत आहे, जेणेकरून सर्वांना गॅस सिलिंडर परवडतील.
<<< येथे क्लिक करा >>>
This post was last modified on June 28, 2024 10:41 am