महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर उद्या म्हणजेच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. १० जानेवारी २०२३ रोजी जी सुनावणी झाली होती त्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारी ही तारीख दिली होती.
जर हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे पाठवायचे मंजूर झाले तर मग अंतिम निकाल येण्यासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागेल. उद्या सर्वोच्च न्यायालय नेमकं काय निर्देश देणार याकडे शिंदे ठाकरे दोन्ही गटाचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
“जर हे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे पाठवलं गेल नाही, तर घटनापीठ या प्रकरणात अंतिम निर्णय देईल. १४ ते २१ फेब्रुवारी दरम्यान या प्रकरणावर निकाल येणे अपेक्षित असणार आहे,” असं मत घटनातज्ज्ञ सिद्धार्थ शिंदे यांनी १० जानेवारी ला व्यक्त केलं होतं.
This post was last modified on February 13, 2023 11:20 am