X

LOVE: मुसळधार पावसात आईनं स्वत:च्या पंखांचं केलं छप्पर ,आईची माया! तुफान VIRAL झालेला व्हिडिओ एकदा पहाच

आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते

आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. मग ती माणसांची आई असो किंवा प्राण्यांची, आई ही आईच असते. आईची माया अथांग आहे.

आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. असाच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कोंबडीनं तिच्या लहान लहान पिल्लांचा बचाव केला असून प्राण्यांमधील आई प्रेम या व्हिडीओतून पाहायला मिळतंय.

आई ने पिल्लांसाठी केलं स्वत:च्या पंखांचं छप्पर
या व्हिडीओमध्ये एक कोंबडी भर पावसात तिच्या पिल्लांच्या संरक्षणासाठी त्यांना स्वत:च्या पंखांचा आधार देताना दिसत आहे. भर पावसात ती स्वत: भिजतेय मात्र तिचं एकही पिल्लू भिजू नये याची ती पूरेपूर काळजी घेत आहे. तीनं सर्व पिल्लांना अगदी मिठीत घट्ट पकडल्यासरख पंखांखाली सावरुन घेतलं आहे. आयएएस अधिकारी डॉ सुमिता मिश्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी व्हिडीओला ‘आई ही आईच असते मग ती माणसाची असो किंवा प्राण्यांची’ असं कॅप्शन दिलंय.

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून हा व्हिडीओ लोक शेअर करत आहेत. या व्हिडीओला आत्तापर्यंत 99 हजार लोकांनी पाहिलं असून व्हिडीओ पाहून अनेक जण भावूक झाले आहेत.

इंटरनेटवर प्राण्यांचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपल्या आईची आठवण झालीय.

This post was last modified on March 11, 2023 11:56 am

Davandi: