Loksabha election 2024 Exit poll : मोदींच्या स्वप्नांचं काय सगळे एक्झिट पोल काय सांगतात वाचा सविस्तर

Loksabha election 2024 Exit poll : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन होणार असल्याचा निष्कर्ष बहुतांश एक्झिट पोलमधून काढण्यात आला आहे. मात्र भाजपप्रणीत एनडीए आघाडीला ४०० हून अधिक जागा मिळण्याबाबत एक्झिट पोलमध्ये शंका व्यक्त करण्यात आली आहे. एक्झिट पोलमधून काढण्यात आलेल्या बहुतांश निष्कर्षातून मोदींचे “अबकी बार; ४०० पार” चे स्वप्न भंगताना दिसत आहे.

Loksabha election : एक्झिट पोल आणि त्यांचे अंदाज

एबीपी सी-व्होटर : एनडीएला ३५३-३८० जागा तर इंडिया आघडीला १६२-१८२ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

इंडिया टीव्ही-सीएनएक्स : एनडीएला ३७१ – ४०१ जागा तर इंडिया आघडीला १०९ – १३९ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

जन की बात : या एक्झिट पोलने एनडीला ३६२ – ३९२ व इंडिया आघाडीला १४१ – १६१ जागा मिळतील असे म्हटले आहे.

एक्झिट पोलने >>> येथे क्लिक करा <<<

tc
x