Lok Sabha Election Results 2024 LIVE: : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या हाती आलेल्या आकडेवारीवरुन हे निश्चित आहे की, देशात सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन होईल, मात्र पंतप्रधान मोदींचा 400 पारचा नारा सपशेळ फेल ठरला आहे.
भाजपसाठी परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, ते एकट्याने बहुमताचा आकडा पार करू शकत नाहीत आणि संपूर्ण एनडीएला एकत्रितपणे 300 चा आकडा पार करण्यात अपयशी होताना दिसत आहे. याचा अर्थ एक्झिट पोलसह सर्व तज्ज्ञांचे दावे फोल ठरले आहेत.
◆ भाजपची सध्या स्थिती
निवडणूक आयोगाने दुपारी एक वाजेपर्यंत जाहीर केलेल्या ट्रेंडनुसार, भाजप 241 जागांवर आघाडीवर आहे. याचा अर्थ भाजप कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवण्याच्या स्थितीत नाही. तर एनडीएबद्दल बोलायचे झाले तर ते जवळपास 285 जागांवर आघाडीवर आहे.
दुसरीकडे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या 52 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने जोरदार पुनरागमन केले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकट्याने 95 जागांवर आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडी एकत्रितपणे 250 जागांच्या आसपास आहे. म्हणजेच, सर्व एक्झिट पोल आणि तज्ज्ञांचे दावे खोटे ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
◆ एबीपी न्यूज सी व्होटरचा एक्झिट पोल
>>>>येथे क्लिक करा <<<<