चला आयुष्यावर बोलु काही…….
कोणी ऐकायला नाही,कोणी बोलायला नाही,सोबत कोणी नाही अरे ठिक आहे ना! मग रडायचं का असं हे चुकीचं आहे.
आरशासमोर उभा रहा ऐकवं त्याला मनातलं सगळं जे काही आहे ते. एका विदूषका सारखं पागल होवून बघ तो काय म्हणतो, चुक कळेल स्वत:वर हासू आणि आसू येतील. पुसून टाक अश्रू.
आता विचार प्रश्न त्याला माझ्या सोबत का असं होतं आहे? बघितलं आरशात जो व्यक्ती दिसत आहे तो तुझा शत्रू आहे.
तु दोष इतरांना देत आहेस..
अरे वेड्या जे सोडून गेले ते तुझे कधी आपले नव्हतेच,परत रडतोस वाईट झालं म्हणून वाईट तु वाटून घेत आहेस व्यर्थ गोष्टी चा विचार करून अरे तु स्वार्थी लोकांन कडून अपेक्षा केली ना म्हणून तुझ्या पुर्ण आयुष्या ची दिशा बदलली.
ठिक आहे समजू शकतो मी तु खुप जीव लावला, आपलं समजलं चल रडून घे मनसोक्त आहे तेवढं. नदी एवढं पाणी आज बाहेर काढ.
ये वेड्या नदी एवढं म्हणलं होतं, तु तर आख्या समुद्राच पाणी डोळ्यात साठवून ठेवलं होतस.
बरं ऐक तुझ्या समुद्राच पाणी कमी झालं असेल तर आता या आरशा मध्ये जो व्यक्ती उभा आहे त्याला थोडं समजून सांगायचं का…?
रस्त्यावर कधी नाचला का? तु तुझ्या आवडीचे कपडे घातलेस? केस हवे तसे कापलेस? पागल सारखं एकटं स्वत:सोबत बोललास का? काय बोलला? लोकांचा विचार करून सारं राहून गेलं आणि आज त्या लोकांन पैकी कांही तुझं मन दु:खवून दुर गेली.
माणसाच्या गर्दी मध्ये स्वता;ला हरवून गेलास आणि खरा आनंद आयुष्याचा कश्यात आहे हेच विसरलास,असो तुझ्या पेक्षा ही दु:खी लोकं या भुतलावर आहेत.
तुझं दु:ख तु निर्माण करत आहेस. आज तुझ्या कडे वेळ आहे काहीतरी मिळवण्यासाठी,स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तो वेळ फक्त तुझ्यासाठी आहे तो तु आयुष्याच सोपं कोडं कठिण करून सोडवण्यात वाया घालवत आहेस.
लोकांचा विचार न करता मनसोक्त माकडा सारख्या उड्या मार. वाघा सारखा राजा बनून जग. वेडा हो जास्त शहाणा झालास तर तुला इथं लोक सुखाने जगू देणार नाहीत.
आपलं दुःख स्वत:ला सांग कमजोरी लोकांना कळाली कि जखमेवर मीठ आणि लिंबू पिळणारी इथे भरपूर लोकं आहेत.
गर्दी खुप करतील तुझ्या पुढे तुझ्या मागच्या खिश्यात पैसा असेल तर. वेळो_वेळी आयुष्याच पानं मन लावून वाच आणि त्या मधून शिकुन घे आणि पुढे चल. थांबू नको कळलं का आणि थांबल्यास समजून जा तु आयुष्याची शर्यत हारला आहेस.
चित्ता जसा वेगाने धावतो तसा दुनिया चा विचार न करता तु तुझ्या ध्येया मागे धाव नंतर लोकं एक दिवस स्वता: तुझा विचार करतील…