Lek Ladki Yojna : मुलीच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरू झालेली आहे. लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने १ लाख १ हजार रुपये मिळतील, अशी तरतूद महाराष्ट्र शासनाने केली आहे. लाभार्थीना या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी मनोज ससे यांनी केले आहे.
‘लेक लाडकी’ या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करेल. ही आर्थिक मदत मुलीचे १८ वर्ष वय होईपर्यंत सरकारकडून दिली जाईल. या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना दिला जातो. इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये; तर १८ वर्षांची झाल्यानंतर मुलीला रोख ७५ हजार रुपये दिले जातील.
लाभ घेण्यासाठी नियमावली
■ पिवळ्या, केशरी शिधापत्रिकाधारक
कुटुंबामधील १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या एक अथवा दोन मुलींना ही योजना लागू असेल.
■ एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लाभ मिळेल.
■ पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी, दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना मातापित्यांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
■ दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास मुलीला; तर दोन्ही मुली असल्यास दोघींनाही योजनेचा लाभ मिळेल. मात्र,
Lek Ladki Yojna शासनाने एक एप्रिल २०२३ पासून ही योजना सुरू अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद
त्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक.
लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवाशी असावे.
लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्राचे असावे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : येथे क्लिक करा