Learning License : घरबसल्या लर्निंग लायसन्स काढा, ऑनलाइन प्रक्रिया सोपी आहे!

Learning License : लर्निंग लायसन्स घरबसल्या मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट https://sarathi.parivahan.gov.in/ वर जावे लागेल.

यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. यानंतर तुम्हाला Apply for Learner License या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

येथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड क्रमांकाद्वारे अर्ज करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यातून तुम्ही घरी बसून टेस्ट देणार की आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन हे देखील निवडावे लागेल.

यानंतर तुम्हाला आधार कार्डचा तपशील आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल.

Learning License : त्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल.

OTP टाकल्यानंतर, तुम्हाला खालील टिक बॉक्सवर क्लिक करून पेमेंट मोडवर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला 10 मिनिटांचा ट्युटोरियल व्हिडिओ पाहावा लागेल ज्यामध्ये ड्रायव्हिंगबाबत काही सूचना दिल्या जातील.

>>>मतदान नक्की कराच.

व्हिडिओनंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP आणि पासवर्ड पाठवला जाईल.

यानंतर, तुम्हाला तुमचा फॉर्म भरावा लागेल आणि परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनचा फ्रंट कॅमेरा किंवा वेबकॅम चालू ठेवावा लागेल, तुम्हाला 10 पैकी 6 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील

जर तुम्ही परीक्षेत नापास झालात तर तुम्हाला पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. पण यासाठी तुम्हाला ५० रुपये फी भरावी लागेल, जर तुम्ही परीक्षेत पास झालात.

तुम्हाला शिकाऊ परवाना फक्त PDF फॉर्ममध्ये मिळेल. ज्यावरून तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून घेऊ शकता

कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयात जावे लागेल.

>>>> व्हॉट्सअॅपवर 👋हातांच्या इमोजीचा वापर कसा करावा

>>> राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय: ३४५ नवीन पाळणाघरे उभारणार

>>> विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाची काय वचनं ,पहा यांचा जाहीरनामा प्रसिद्ध

tc
x