१ रुपयाच्या संकल्पनेतून जाणून घ्या अर्थसंकल्पीय गणित

१ रुपयाच्या संकल्पनेतून जाणून घ्या अर्थसंकल्पीय गणित
💰 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. या पार्श्वभूमीवर समजून घेऊ सरकारला उत्पन्न कुठून मिळते? ते कुठे खर्च होते? याचे गणित 1 रुपयाच्या संकल्पनेतून…

🎯 आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जारी बजेट डॉक्युमेंट्सनुसार, सरकार आपल्या उत्पन्नातील बहुतांश भाग व्याजाची परतफेड करण्यावर खर्च करते. त्या

🔎 नंतर टॅक्स व ड्यूटीजमधील राज्यांच्या वाट्याचे पेमेंट करते. तद्नंतर केंद्रीय क्षेत्रातील योजनांवर खर्च करतो.

💁♂️ आता आपण हा खर्च खाली दिलेल्या एका उदाहरणावरून समजून घेऊ. यासाठी सरकारचा एकूण खर्च 1 रुपया आहे असे मानू…

▪️ व्याज परतफेड : 20 पैसे
▪️ कर शुल्कातील राज्यांचा वाटा : 17 पैसे
▪️ सेंट्रल सेक्टर स्कीम : 15 पैसे
▪️ फायनान्स कमीशन व अन्य ट्रान्सफर : 10 पैसे
▪️ केंद्र पुरस्कृत योजना : 9 पैसे
▪️ सब्सिडीज : 8 पैसे
▪️ संरक्षण : 8 पैसे
▪️ इतर खर्च : 9 पैसे
▪️ पेंशन : 4 पैसे

tc
x