Land Records Maharashtra | आजोबांची हडप केलेली जमीन अशी मिळवा परत, वाचा सविस्तर

Land Records Maharashtra: गाव-खेड्यातला सर्वाधिक वादाचा विषय म्हणजे, शेतजमीन.. भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये शेत जमिनीवरुन वाद ठरलेला.. हा वाद कधी कुठे जाईल सांगता येत नाही. शेतजमिनीवरुन होणाऱ्या वादांमुळे मारामाऱ्या होतात. यामुळे कित्येकांचं आयुष्य कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात जाते.

अनेक कुटुंबांत असं होतं की, दोन, तीन किंवा यापेक्षा जास्त भाऊ असतात. समजा, आजोबा असताना यामधील मोठ्या चुलत्याने जास्त जमीन नावावर केली. अशा स्थितीत काही पर्याय आहे का? ज्याद्वारे तुम्ही आजोबा नसताना दुसऱ्याच्या नावावर असलेल्या जमिनीचे समान वाटे करू शकता. शेतकरी बांधवांनो यासाठी कायदा आहे. हडप केलेली जमिन नावावर करू शकता.

land record शेतकरी बांधवांनो, हडप केलेली जमिन तुम्हाला मिळवता येणार आहे. यासाठी तुम्हाला वादविवाद करण्याची गरज नाही. यासाठी कायदा दिलेला आहे. या कायद्याच्या साहाय्याने आजोबाची हडप केलेली जमीन परत मिळवू शकता. यासाठी कोणते कायदे आहे, याची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या..

हडप केलेल्या जमिनी संबंधित कायदे
कलम 406 – कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेमध्ये विश्वासाच्या आधारे कोणाचीही जमीन हडपणे किंवा ताब्यात घेणे गंभीर गुन्हा आहे. Land Records तुम्ही तुमच्यावर झालेल्या अन्यायाबाबत या कलमातंर्गत संबंधित पोलीस स्टेशन हद्दीत तक्रार करू शकता.

कलम 467 – कोणतीही मौल्यवान सुरक्षा किंवा इच्छापत्र, इत्यादी खोट्या गुन्ह्याशी संबंधित आहे. या कलमाच्या तरतुदींनुसार, कोणीही, अशा कोणत्याही दस्तऐवजाद्वारे ज्याचा अर्थ असा आहे की कोणतीही मौल्यवान सुरक्षितता किंवा इच्छा किंवा मुलगा दत्तक घेण्याचे अधिकार आहेत.

कलम 420 – या कलमानुसार, कोणी फसवणूक केली, अप्रामाणिकपणा केला, कोणाची मौल्यवान वस्तू किंवा मालमत्ता फसवून हडप केली, ती नष्ट केली किंवा अशा कृत्यात दुसर्‍याला मदत केली, तर या कलमाखाली अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाते.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-1966 या कायद्यामध्ये शेतीच्या ‘सीमा व चिन्हे’ असे नववे प्रकरण आहे. त्यात शेतीच्या सीमा निश्चित करणे, त्याबद्दलच्या वादाचे निराकरण करण्याबाबतचा उल्लेख आहे. कोणत्याही शेतीच्या सीमारेषेबाबत वाद निर्माण झाल्यास, संबंधिताना पुरावा सादर करण्याची संधी देऊन जिल्हाधिकारी त्यात दुरुस्ती करू शकतात.

tc
x