Lakhapati didi yojna : महिलांना व्यवसायासाठी मिळणार 5 लाख रुपये ! कोणत्या महिलांना मिळणार लाभ ? वाचा योजनेचे कागदपत्र, पात्रता, अटी
केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील देशभरातील महिलांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये केंद्राच्या मोदी सरकारने सुरू केलेल्या लखपती दिदी योजनेचा देखील समावेश होतो. ही योजना देशातील महिलांसाठी सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध व्यासपीठांवरून माहिती दिली आहे. लखपती दीदी योजनेच्या लाभार्थ्यांसोबत नरेंद्र मोदी यांनी मागे एक कार्यक्रम घेऊन बातचीत सुद्धा केली होती. या योजनेमुळे देशभरातील महिलांना आर्थिक प्रगती साधता येत आहे. या योजनेचा अर्थसंकल्पात देखील उल्लेख झाला होता.
मात्र असे असले तरी या योजनेची अनेकांना माहिती नसल्याचे उघडकीस आले आहे. अनेक महिलांना लखपती दिदी योजना नेमकी काय आहे, या अंतर्गत कोणकोणते लाभ त्यांना मिळतात याविषयी माहिती नाहीये. यामुळे आज आपण या योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे लखपती दीदी योजना
मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत या योजनेचा देशभरातील एक कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे. विशेष म्हणजे या योजनेचे उद्दिष्टे देखील आता वाढवण्यात आले आहे. वर्तमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेअंतर्गत आता देशभरातील दोन कोटी महिलांना नाही तर तीन कोटी महिलांना लाभ दिला जाणार आहे.
म्हणजेच, या योजनेचे उद्दिष्टे एक कोटी लाभार्थ्यांनी वाढवले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जात आहे. एलईडी बल्ब बनवणे, ड्रोन चालवणे, ड्रोन दुरुस्ती करण्यासह प्लंबिंगचे प्रशिक्षण असे वेगवेगळ्या कौशल्याचे प्रशिक्षण या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जात आहे.
हेही वाचा : आजपासून IPL चा महासंग्राम! येथे मोफत पाहता येईल?
ही योजना फक्त प्रशिक्षणच देते असे नाही तर महिलांना आर्थिक मदतही पुरवत आहे. ही योजना राज्यातील स्वयं-सहायता गटांमार्फत चालविली जात असल्याची माहिती सरकारकडून मिळाली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक मदत म्हणून कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
किती कर्ज मिळते येथे क्लिक करा