Ladki Bahin Yojna 2024 लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार? याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2025) मुहुर्तावर मिळणार आहे. म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार? याकडे आता लक्ष लागले आहे. मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली होती.
लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. सध्या सुमारे 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेंतर्गत विचार केला जात नाही. राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार? याकडे आता लक्ष लागले आहे. मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली होती.