X

Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना खरंच पाच हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार? नेमका शासन निर्णय काय?

Ladki Bahin Yojna

Ladki Bahin Yojna : सरकारकडून आता लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार असल्याचंही वृत्त पसरत आहे. काही निवडक महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार असल्याचंही या वृत्तांमधून सांगण्यात आलंय. त्यामुळे हे वृत्त खरं आहे का?

याबाबत खरंच शासननिर्णय झाला का?


आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमाही झाले आहेत. त्यामुळे आता थेट डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात येतील. मात्र, याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, सरकारकडून अजून अडीच हजार रुपये मिळणार असल्याचं वृत्तही काही वृत्तसंकेतस्थळांनी दिलं आहे. त्यामुळे अनेक महिला या अडीच हजार रुपयांची वाट पाहत आहेत. हे पैसे कधी मिळणार याबाबत या वृत्तांमध्ये काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला वर्गांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय.

लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना दिवाळी बोनस मिळणार नाही

दरम्यान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी साधलेल्या संवादानुसार, लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. बोनसबाबतचे वृत्त खोटं असून सरकारकडून अशी कोणतीच घोषणा झालेली नसल्याचं आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

तसंच, काही दिवासंपूर्वी मोबाईल गिफ्ट मिळणार असल्याचंही सांगण्यात येत होतं. मात्र, याबाबतही कोणताच शासन निर्णय झालेला नाही. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे अनेक महिलांची फसवणूक होऊ शकते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनासंदर्भात अधिकृत माहिती घेण्याकरता सरकारच्या संकेतस्थळावर जाऊनच खातरजमा करून घ्या. अन्यथा तुमचा आर्थिक फसवणूक होऊ शकते.

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, जाणून घ्या महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण

हेही वाचा : आता घरबसल्या काढा आपल्या शेतजमिनीचा नकाशा

हेही वाचा : शिधापत्रिकाधारकांना मिळणारी योजना बंद

This post was last modified on October 18, 2024 9:32 am

Davandi: