X

Ladki Bahin Yojna : “लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळतील? फडणवीसांची मोठी घोषणा!”

Ladki Bahin Yojna

“महाराष्ट्रातील लाखो महिलांना लाभ देणारी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केला होता. या अर्जदारांना पैसे कधी मिळतील, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.”

फडणवीसांच्या भाषणातून उद्धृत:

फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, “… (“वर्षाला अकरा हजार रुपये म्हणजेच महिन्याला दीड हजार रुपये लाडक्या बहि‍णींच्या खात्यात देत आहोत. ज्यांचे ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देऊ. तसंच, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येही पैसे देऊ”, अशी माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.).”

जर फडणवीसांनी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येही पैसे देऊ

 सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे. परंतु, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांना कधी पैसे मिळणार याबाबत सरकारकडून अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. नागपूर येथे आयोजित केलेल्या बांधकाम कामगार मेळाव्यात ते बोलत होते.

अर्जदारांसाठी महत्त्वाची माहिती:

  • अर्जदारांनी आपल्या बँक खात्याची माहिती योग्य पद्धतीने भरली आहे याची पुष्टी करावी.
  • कोणतीही समस्या असल्यास, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात रहावे.
  • योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून नियमित अपडेट्स तपासाव्यात.

लाडकी बहीण योजना दीर्घकाळासाठी

“कोणतीही योजना एका रात्रीत जाहीर होत नाही. त्यामागे बरीच तयारी असते. अभ्यास करावा लागतो. या योजनेचा लाभ कुणाला द्यावा याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. केवळ दारिद्यारेषेखालील नागरिकांसाठी योजना असावी की सर्वसमावेशक असावी, त्यासाठी किती निधी लागेल या सर्व बाबींचा तपशीलवार विचार करण्यात आला. आम्हाला ही योजना दीर्घकाळ चालवायची आहे. त्यामुळे विचारपूर्वक, पूर्वतयारी करून निर्णय घेतला आहे”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी लोकसत्ताच्या मुलाखतीत दिली होती.

This post was last modified on September 22, 2024 6:29 am

Davandi: