Ladki Bahin Yojna : महिलांसाठी 4 तासांची नोकरी, 11 हजार रुपये पगार आणि जेवण

Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेनंतर आता सरकारकडून महिलांना आणखीन एक भेट देण्यात येणार आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून महिलांना महिलांना चार तासांचा पार्ट टाइम जॉब देणार आहे. यासाठी महिलांना 11 हजार रुपये मानधन देखील मिळणार आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

Ladki Bahin Yojna : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर ही योजना महिलावर्गात चांगलीच लोकप्रिय झालेली दिसत आहे. मात्र या योजनेतून महिलांना रोजगार मिळत नाही, महिलांना रोजगार उपलब्ध करून द्या, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. आता राज्य सरकारने यावर देखील नवीन योजना आणायचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : लाडक्या बहिणींना अन्याय! पैसे कापणाऱ्या बँकांवर कारवाईची मागणी

महिलांना थेट टाटा कंपनीत नोकरी देण्यात येणार आहे. चार तासांच्या या अर्ध वेळ नोकरीसाठी महिलांना 11 हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. यासोबतच एक वेळचा नाश्ता आणि जेवण देखील महिलांना दिलं जाणार आहे. यासंदर्भातील माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यामुळे गरजू महिलांना या योजनेचा मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा : : ONGC मध्ये बंपर भरती! दहावी पासपासून पदवीधरांसाठी संधी

हेही वाचा : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी?

tc
x