Ladka Bhau Yojna 2024 : महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. पण या योजनेसाठी सरसकट सगळेच तरुण पात्र राहणार नाहीत. सरकारने पात्र तरुणांसाठी काही अटी ठेवल्या आहेत.
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहे. सरकार राज्यातील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये बेरोजगार तरुणांना अप्रेंटिसशिप किंवा प्रशिक्षण मिळवून देईल.
याशिवाय सहा महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर संबंधित कंपनी किंवा कारखान्यातून प्रमाणपत्र देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्याचा फायदा नोकरी मिळवताना होणार आहे.
यो योजनेसाठी नेमके पात्र तरुण कोण आहेत?
● या योजनेसाठी सर्वात पहिली अट ही संबंधित तरुण हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.
● दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तरुणाचं वय हे 18 ते 35 वयोगटाच्या आत असावं.
● तरुणाचं शिक्षण हे 12 वी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर इतकं झालेलं असावं.
● संबंधित तरुण हा बेरोजगार असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळेल
● तरुणाचं बँक खातं आधारकार्डशी जोडलं गेलेलं असायला हवं
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..
हे ही वाचा >>> ५०,००० कर्ज मिळवा!प्रधानमंत्री स्वनिधी
संपूर्ण माहिती येथे पहा