Salary Account Benefits: झिरो बॅलन्ससह सॅलरी अकाउंटमध्ये आणखी कोणत्या सुविधा मिळतात जाणून घ्या
ज्या बँक खात्यामध्ये आपल्याला दर महिन्याचा पगार येतो, त्या खात्याला ‘सॅलरी अकाउंट’ म्हटले जाते. सॅलरी अकाउंट हे सेविंग्स अकाउंट प्रमाणेच असते, पण यावर सेविंग्स अकाउंट पेक्षा जास्त सुविधा उपलब्ध असतात. चेकबुक, एटीएम, नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड या सेविंग्स अकाउंटप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या सुविधांशिवाय इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत जाणून घ्या.
Salary Account Benefits:
झिरो बॅलन्स सर्विस
सॅलरी अकाउंटचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यावर झिरो बॅलन्स सर्विस उपलब्ध असते. म्हणजेच या खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची चिंता नसते. जर यामध्ये काहीही रक्कम नसेल तरीही बँकेकडुन कोणतीही पॅनल्टी आकारण्यात येत नाही. हा ऐक फायदा आहे.
कर्ज घेणे सोपे होते
सॅलरी अकाउंटवरुन पर्सनल लोन, कार लोन, होम लोन मिळवणे सोपे होते, कारण बँक स्टेटमेंटद्वारे बँकेकडे उत्पन्नाचा ढोस पुरावा असतो. त्यामुळे सॅलरी अकाउंटचा हा फायदा असल्याचे म्हणता येईल.
हे पण वाचा 👇👇
नोकरी सोडल्यानंतर नोटीस पीरियड पूर्ण करणं गरजेचं आहे का? जाणून घ्या नियम / अटी
ओवरड्राफ्ट सुविधा
२ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या सॅलरी अकाउंटवर ओवरड्राफ्टची सुविधा उपलब्ध होते. २ महिन्यांच्या पगाराइतकी ओवरड्राफ्टची लिमिट असते.
एटीएम ट्रान्झॅक्शन
बहुतांश बँका सॅलरी अकाउंटवर फ्री एटीएम ट्रानजॅक्शन सुविधा उपलब्ध करतात. यात एसबीआई, आईसीआईसीआई बँक , एक्सिस बँक, एचडीएफसी बँक या बँकांचा समावेश आहे.
वेल्थ सॅलरी अकाउंट
जर एखाद्या व्यक्तीकडे जास्त पैसे असतील तर ते वेल्थ सॅलरी अकाउंट देखील उघडू शकतात. या अंतर्गत बँकेकडुन डेडिकेटिड वेल्थ मैनेजर देण्यात येतो, जो बँकेशी संबंधित सर्व काम पाहतो.