Kavita2024 : लाडाची बहीण
शासनाला बहिणीची
आठवण आली
लाडा कौतुकाची
सर्वांची लाडली
मध्यप्रदेशासोबत आपले
तसे फार जुने नाते
बँकेत मामाने भाचीसाठी
उघडून दिले होते खाते
त्या खात्यात दर महिन्याला
पाठवतात पंधराशे धनराशी
राहिले पाहिजे सर्व सुखी
बहिण असो की भाची
हेही वाचा : माझी लाडकी बहीण योजना मध्ये झाले मोठे बदल
ठरविले आहेत भावाने
बहिणीला द्यायची साथ
ही योजना होणार सुरु
आपल्या महाराष्ट्रात
भावाने या योजनेला
दिले बहिणीचे नाव
सुरुवातीला नियमामध्ये
वाटत होता भेदभाव
बहिण तर बहीण असते
गरीब असो की धनवान
आदर सत्कार करावा तर
सर्वांचा सम-समान
हेही वाचा : कुणाला मिळणार 3 सिलेंडर मोफत तुम्हाला भेटतील का पहा
शासनाच्या तिजोरीवर
पडणार अधिक भार
थोडा का होईना
मिळेल कुटुंबाला आधार
शेतकरी भावाकडेही शासना
आता तरी ठेवशील लक्ष
शेतात बांधावरती पोशिंदाच्या
येऊन पाहशील प्रत्यक्ष
शेतमालाला अन्नदात्यांच्या
भाव देशील योग्य
जगतील सुखामध्ये जीवन
असे लाभू द्या सौभाग्य
This post was last modified on July 4, 2024 1:25 pm