ITR Rules : ITR बद्दलचे नेहमी पडणारे प्रश्न
आपला टीडीएस माघारी मिवण्यासाठी तसेच कधी कधी आपल्याला उद्योगासाठी कर्ज प्रकरण करायचे असते, एखाद्या सरकारी स्कीम चा फायदा घ्यायचा असतो , घरकर्ज किंवा वाहन कर्ज करायचे असते त्यावेळेस आपल्याला बँकेमध्ये उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागतो. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कडे त्याचे पगाराची स्लिप दरमहा येते आणि तो त्याच्या उत्पन्नाचा पुरावा देखील असतो. पण उद्योग करणाऱ्या व्यक्ती कडे कोणताही उत्पन्नाचा पुरावा नसतो. आणि त्यामुळेच ITR महत्वाचा असतो. त्याबद्दल काही गैरसमज किंवा प्रश्न आहेत ते पाहू.
१. इन्कम टॅक्स रिटर्न भरला म्हणजे टॅक्स पण भरावा लागतो?
इन्कम टॅक्स आणि इन्कम टॅक्स रिटर्न ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे तुम्ही आर्थिक वर्ष्यात किती उलाढाल केले , त्यातून किती फायदा कमवला, तुमचे त्यातून किती खर्च झाले, किती गुंतवणूक झाली, ई गोष्टींचे डिटेल म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न ( ITR ). जर तुमचा सर्व खर्च जाऊन निव्वळ नफा ५ लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो. जर ५ लाख पेक्षा वार्षिक नफा कमी असेल तर फक्त इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल टॅक्स नाही.
२. इन्कम टॅक्स एकदा भरला म्हणजे नेहमी भरावा लागतो❓
बिझिनेस मध्ये उत्पन्न कधीच स्थिर नसते, कधी फायदा होतो तर कधी नुकसान. जर तुमचा उद्योगातून काही फायदाच झाला नाही तर तुमचे उत्त्पन्न सुद्धा करपात्र नसेल आणि त्यामुळे तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. ज्या वर्षी तुमच्याकडे करपात्र उत्त्पन्न नसेल तितक्या वर्षी तुम्ही टॅक्स भरणे गरजेचे नाहीये.पण तुम्ही रिटर्न म्हणजेच टॅक्स न भरता फक्त डिटेल देऊन ITR भरू शकता.
३. किती रुपये पेक्षा जास्त फायदा झाला म्हणजे टॅक्स भरावा लागेल ?
तुमच्या एकूण विक्री मधून तुमचा सर्व खर्च वजा केला तर तुमचा नफा उरतो. त्या नफ्यातून तुमचे अजून विविध खर्च वजा होतात जसे कि तुम्हे विमा पोलिसी , कर्जावरचे व्याज, मुलांच्या शाळेचा खर्च, दवाखान्याच्या खर्च , काही प्रकारच्या देणग्या, ई. हे खर्च वजा करून जर तुमचे उत्पन्न ५ लाख पेक्षा जास्त होत असेल तर तुम्हला टॅक्स भरावा लागेल.
४. जर टॅक्स भरायचे नाही तर मग इन्कम टॅक्स रिटर्न का भरायचे ?
सविस्तर माहितीसाठी >>> येथे क्लिक करा <<<,