IPL २०२४ : उद्या 22 मार्चपासून रंगणार IPL चा महासंग्राम – जाणून घ्या कुठे पाहता येणार मोफत सामने ?
येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात होणार असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यामध्ये रंगणार आहे.
दरम्यान मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तुम्हाला IPL चे सामने मोफत पाहता येणार आहेत.
कुठे पाहता येणार आयपीएलचे फ्री सामने ?
आयपीएलचे सामने यंदाही फ्री पाहता येणार आहेत. यावेळी IPL सामना Jio सिनेमावर दाखवला जाणार आहे. जिओ सिनेमा यासाठी चाहत्यांकडून एक रुपयाही आकारणार नाही.
चाहत्यांना सर्व सामने फ्री ऑनलाइन पाहता येणार आहेत. जिओ सिनेमाने याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
टीव्हीवर कुठे पाहू शकता आयपीएलचे सामने ?
▪️ तुम्हाला आयपीएल टीव्हीवर पाहायची असेल तर तुम्ही ते स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता. यावेळी आयपीएलची कॉमेंट्री हिंदी, इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये असणार आहे.
▪️ गेल्या वेळी जिओ सिनेमाने चाहत्यांना भोजपुरी, तामिळ आणि तेलगू भाषेत कॉमेंट्रीचा पर्याय दिला होता. दरम्यान यावेळीही प्रेक्षकांना याचा अनुभव घेता येणार आहे.
Jio सिनेमावर मोफत IPL सामने पाहता येणार – हि बातमी आपण आपल्या मित्रांना देखील शेअर करा.
‘आयपीएल’ २०२४: कोणते खेळाडू ठरणार ‘गेमचेंजर्स’? येथे पहा
>>>येथे क्लिक करा <<<