
IndianEconomy 2025
IndianEconomy 2025 : : जागतिक आर्थिक व्यवस्थेत भारताने आणखी एक दमदार पाऊल टाकलं आहे. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांनी शनिवारी (ता. २४) ही माहिती दिली.
नीति आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

हेही वाचा : महिलांसाठी सरकार देत आहे मोफत पिठाची गिरणी – तुम्ही पात्र आहात का?
देशाची आर्थिक स्थिती चांगली
भारतासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे. आता आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. देशाची अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन डॉलर्सची झाली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था जपानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी झाली आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनीच भारताच्या पुढे आहेत. जर योजना तयार करून काम करत राहिलो तर पुढील अडीच ते तीन वर्षांत तिसरी अर्थव्यवस्थाही होऊ शकतो, असा विश्वास सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला.