भारताचा राष्ट्रध्वज, तिरंगा, हा आपल्या देशाचा अभिमान आणि एकता दर्शवणारा प्रतीक आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपण तिरंग्याविषयी काही महत्वाची माहिती जाणून घेऊया.
Independence Day 2024 Quiz: अगदी शाळेत असल्यापासून आपण प्रत्येकवर्षी भारताच्या स्वातंत्र्य दिनासंदर्भातील अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला खरंच स्वातंत्र्यदिनासंदर्भात आणि तिरंग्याबद्दल किती गोष्टी ठाऊक आहेत? हे जाणून घेण्यासाठी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त खास तिरंगा क्विझ आणलं आहे. पटकन हे क्विझ सोडवा आणि स्वातंत्र्य दिन आणि भारताच्या तिरंग्यासंदर्भात तुम्हाला किती माहिती आहे हे जाणून घ्या.
स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा क्विझ
भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. अगदी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, सरोजिनी नायडू यांच्यापर्यंत अनेकांनी आपले आयुष्य पणाला लावले. दुःखाच्या अनेक झळा सोसल्यानंतर अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
This post was last modified on %s = human-readable time difference 10:48 am